Total Pageviews

THE HIMALAYAN DISASTER: TRANSNATIONAL DISASTER MANAGEMENT MECHANISM A MUST

We talked with Palash Biswas, an editor for Indian Express in Kolkata today also. He urged that there must a transnational disaster management mechanism to avert such scale disaster in the Himalayas. http://youtu.be/7IzWUpRECJM

THE HIMALAYAN TALK: PALASH BISWAS TALKS AGAINST CASTEIST HEGEMONY IN SOUTH ASIA

THE HIMALAYAN TALK: PALASH BISWAS TALKS AGAINST CASTEIST HEGEMONY IN SOUTH ASIA

Twitter

Follow palashbiswaskl on Twitter

Sunday, April 7, 2013

AMBEDKARI CHALVALICHE UDDISHT KAY?


AMBEDKARI CHALVALICHE UDDISHT KAY?



AMBEDKARI CHALVALICHE UDDISHT KAY?

by Sunil Khobragade (Notes) on Thursday, November 10, 2011 at 12:30am

महाराष्ट्रातील पूर्वाश्रमीचा महार आणि आत्ताचा बौद्ध समाज एक जागृत समाज म्हणून ओळखला जातो.राजकीय सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात तर बौद्ध अत्यंत सजग आहेत.मात्र ही सजगता आंबेडकरी बौद्धाना एकत्वाच्या धाग्यात गुंफले जाऊन बंधुभाव निर्माण करण्यास उपयुक्त ठरली नाही.त्याचप्रमाणे ज्या जातीव्यवस्थेचे ते बळी आहेत त्या जातीव्यवस्थेला खिंडार पाडण्यासही हि सजगता कामी आली नाही.ज्या सामाजिक समूहाचे नीतीविषयक तत्वज्ञान एक आहे,आदर्श सारखे आहेत, लक्ष्य सारखे आहे,त्यांच्यात बंधुभाव आणि मैत्रीभाव निर्माण होण्यास ख्जारेतर कोणताही अडसर नसावा.मात्र आंबेडकरी बौद्धामध्ये एकमेकाप्रती बंधुभाव आणि मैत्रीभाव व्यवहारात उतरल्याचे दिसत नाही.यासंदर्भात fecbookvaril विविध buddhistt ग्रूप चे उदाहरण बोलके ठरावे.आंबेडकरी बौद्धामधील 18  हजार उच्चभ्रू सदस्य असलेल्या या बुद्धिस्त फ्रेंड्स या  ग्रुपमध्ये विविध विषयावर वाद-विवाद चालू असतात.या चर्चा आणि वादविवादाचे स्वरूप लक्षात घेतले तर आंबेडकरी बौद्ध किती प्रचंड प्रमाणात विघटीत ,असहिष्णू ,दुराग्रही ,आणि त्यामुळे एका विलग बेटात वावरणारे आहेत हे दिसून येते.

                   आंबेडकरी चळवळीचे नेमके उद्दिष्ट काय ?

आंबेडकरी चळवळीचे नेमके उद्दिष्ट काय आहे व आसवे ? तसेच या उद्दिष्टपूर्तीसाठी कोणते मार्ग अवलंबिले पाहिजेत याबाबत फेस्बूकवरच्या   विविध ग्रुपकडून प्रतिक्रिया मागविल्या असता असे दिसून आले की, आंबेडकरी चळवळीचे नेमके उद्दिष्ट काय ?याबाबत स्वतःला कट्टर आंबेडकरी  म्हणविणाऱ्या आंबेडकरी अनुयायामध्ये एकवाक्यता  नाही.काहीना वाटते की,जातीविहीन समाजरचना निर्माण करणे हे आंबेडकरी चळवळीचे उद्दिष्ट आहे.काहीना वाटते कि शासनकरती जमत बनणे हे उद्दिष्ट आहे  तर काहीना भारत बौद्धमय करणे हे आंबेडकरी चळवळीचे उद्दिष्ट आहे असे वाटते .उद्दिष्टात एकवाक्यता नसल्यामुळे उद्दिष्टपूर्तीच्या मार्गातही मतभिन्नता असणे असणे अपरिहार्य  आहे.त्यामुळे कोणी राजकीय सत्ता प्राप्त केल्यामुळे आंबेडकरी चळवळीचे उद्दिष्ट साध्य होईल यावर ठाम आहेत.काही जणांना वाटते की,बौद्ध धर्माचा प्रसार केल्यामुळे उद्दिष्टपूर्ती होईल तर काहीजण विभिन्न जातीचे प्रबोधन करून आंबेडकरवाद यशस्वी होईल यावर ठाम आहेत.हि वस्तुस्थिती विचारात घेतल्यास उद्दिष्टांबद्दलची स्पष्टता आणि  एकवाक्यता नसल्यामुळे मार्गभिन्नता असल्यामुळे एकमेकाबद्दल असहिष्णुता,वैरभाव,दुराग्रह, घट्ट झाले आहेत,असे दिसते.ही दुरिते (evils )  नष्ट करण्यासाठी प्रथमतः आंबेडकरी चळवळीचे नेमके उद्दिष्ट काय आहे/असावे ?यावर विचार करणे आवश्यक आहे.

                    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यावर ,चळवळीवर, आणि ग्रंथावर आतापर्यंत विपुल लेखन झाले आहे.त्यांच्या विचारांच्या वारश्यावर आधारित असंख्य संघटना भारतात कार्यरत आहेत.त्यांच्या लिखाणाच्या विश्लेषणातून आणि विविध संघटनांच्या कार्यक्रमातून आंबेडकरी चळवळीचे एकात्म आणि सुटसुटीत स्वरूप क्वचितच मांडण्यात आले आहे.माझ्या मते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिकतेचा आणि तत्वज्ञानाचा  सर्वोच्च कळस"भारताचे संविधान" आणि "बुद्ध आणि त्यांचा धम्म" या दोन ग्रंथातून प्रतिबिंबित झाला आहे.भारतीय संविधान हि संविधान निर्नात्री सभेची सामुहिक कृती असली तरी या लेखन प्रकल्पाचे वैचारिक आणि तत्वज्ञानात्मक नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आम्बेद्कारणी केले आहे .त्यामुळे भारतीय संविधानाद्वारे हिंदुस्तानात लोकशाही क्रांती करून भारत नावाचा देश निर्माण करण्याचे क्रांतिकार्य डॉक्टर बाबासाहेब आम्बेद्कारणी केले आहे.या क्रांतीकडे अभ्यासकांनी आतापर्यंत गंभीरपणे  लक्ष्य दिले नाही.त्याचप्रमाणे त्यांच्या अनुयायी म्हनाविनार्यानाही या क्रांतीचे नीट आकलन करता आलेले नाही.डॉक्टर बाबासाहेब आम्बेद्काराना मात्र त्यांनी केलेल्या क्रांतीची पुरेपूर जाणीव होती.हिंदुस्थानच्या इतिहासात बुद्धानंतर झालेली ही महत्तम क्रांती यशस्वी व्हावी,तीच विकास व्हावा,आणि ती चिरस्थायी व्हावी हे डॉक्टर बाबासाहेबांचे स्वप्न होते.त्यामुळेच या क्रांतीला पेलणारा,या क्रांतीचा वाहक ठरणारा माणूस घडविण्यासाठी लागणारी सामाजिक मूल्यव्यवस्था कायद्याद्वारे रुजविण्याचे प्रयत्न त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून केले.हे प्रयत्न यशस्वी न झाल्यामुळे "बुद्ध आणि त्यांचा धम्म "या ग्रंथातून नवीन नीती संकल्पना  त्यांनी मांडली.संविधानोत्तर काळातील त्यांच्या लिखाणाचा आणि कृतीचा (हिंदू कायद्याचे  संहितीकरण,बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखन,बौद्ध धर्मांतरण तसेच खुल्या पत्रातून लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी आवश्यक बाबींची केलेली मांडणी)या सर्वांचा एकत्रित विचार केल्यास संविधानाच्या माध्यमातून भारतात घडवून आणलेली लोकशाही क्रांती यशस्वी आणि चिरस्थायी करणे हे आंबेडकरी चळवळीचे अंतिम उद्दिष्ट आहे असे दिसून येईल.हि लोकशाही क्रांती पूर्णत्वास जाण्यासाठी प्रातिनिधिक लोकशाहीचा विकास सहभागी लोकशाहीत होणे आनिसःभागी लोकशाहीद्वारे सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित होणे म्हणजे आंबेडकरी चळवळीचे उद्दिष्ट पूर्णत्वास जाने होय. 

                       कोणत्याही समाजात जेव्हा क्रांती होते तेव्हा त्या समाजाचे घटक असलेल्या व्यक्तींच्या राजकीय सामाजिक आणि आर्थिक संबंधामध्ये बदल होतात.हे बदल नवीन नीतीमूल्यांची मागणी करतात.या बदलांना अनुरूप अशी नितीमुल्ये समाजात रुजविण्याचा प्रयत्न क्रांतुत्तर काळात  झाला नाही तर मात्र क्रांती फसते आणि अवनतीला सुरुवात होते.भारतात नेमकी अशीच अवस्था झाली आहे. डॉक्टर बाबासाहेब आम्बेड्करानी   केलेल्या लोकशाही क्रांतीचे सर्वात मोठे लाभार्थी अनुसूचित जाती/जमाती अन्य मागासवर्गीय व अल्पसंख्याक असल्यामुळे हि अवनती रोखण्याचे काम       

त्यांनाच करावे लागणार आहे.त्यातही या क्रांतीची समज आंबेडकरी बौद्धाना इतरांपेक्षा अधिक असल्यामुळे त्यांच्यावरच हि जबाबदारी प्रामुख्याने येते.मात्र आंबेडकरी बौद्ध या क्रांतीचे वैज्ञानिक विश्लेषण करून या क्रांतीला पूर्णत्वास नेन्याएवजी पोथीनिष्ठ,धर्मवादी,आणि दुराग्रही होत चालले आहेत.यामुळे आंबेडकरवाद हे एक गतिशील तत्वज्ञान बनण्याएवजी त्यास साचलेपण प्राप्त होत आहे.आंबेडकरवादाची उपयुक्तता समाप्त करण्यासाठी महाराष्ट्रातील स्वतःला कट्टर आंबेडकरवादी समजणारे लोकच जास्त जबाबदार ठरत आहेत.ते कसे हे समजून घेण्यासाठी आंबेडकरी बौधानी स्वयंसमीक्षा करणे आवश्यक आहे.

                        समता,स्वातंत्र्य,न्याय,बंधुत्व हा लोकशाही क्रांतीचा मूलाधार                                              समता स्वातंत्र्य न्याय बंधुत्व या तत्वांचा वारंवार उद्घोष आपण वारंवार करीत असतो .मात्र या मुल्यांची सखोल जाणीव कितीजण ठेवतात हा संशोधनाचा विषय ठरावा.जो समता मानतो त्याची दृष्टी सम्यक असणे क्रमप्राप्त आहे.म्हणजेच माणसाकडे त्याने माणूस म्हणून बघणे आवश्यक आहे.

परंतू आपण मात्र शत्रूकेन्द्री विचारसरणी ठेवून माणसाकडे पाहत असतो ब्राह्मण,चांभार,मांग,आर पी आय वाला,ब स प वाला असे लेबल चिकटवून आपण माणसांचे मित्रत्व अथवा शत्रुत्व निश्चित करीत असू तर मग आपण कसले समतावादी?संविधानाने सुनिश्चित केलेल्या धर्म वंश जात लिंग भाषा जन्मस्थान या व तत्सम कोणत्याही कारणावरून कोणाशीही भेदभाव करता येणार नाही या संवैधानिक मूल्याशी हि प्रतारणा नव्हे काय? ज्यांना समता पाहिजे आहे त्याने इतरांशी समतेची वर्तणूक केलीच पाहिजे. स्वातंत्र्याचेही तसेच  आहे.मला जर स्वातंत्र्य पाहिजे तर इतरांच्या स्वातंत्र्याचा मी आदर केला पाहिजे.इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर न करता मला माझ्या स्वातंत्र्याचा आग्रह धरता येणार नाही.स्वातंत्र्य,न्याय या मूल्यांना बहुआयामी पदर आहेत ते समजून न घेता ढोबळ स्वरुपात या मुल्यांचा नुसताच आग्रह धरला जातो.यामुळे असहिष्णुता वाढीस लागते.

      धम्माच्या बाबतीत आपण अत्यंत पोथिनिष्ट आहोत.वास्तविकतः धम्म म्हणजे काय?अध्म्म म्हणजे काय? आणि सधाम्म म्हणजे काय ? यांची सखोल चिकित्सा डॉक्टर बाबासाहेबांनी केली आहे .परंतु महाराष्ट्रातील बौद्ध म्हणविणारे लोक बौद्ध धम्माला संस्थात्मक धर्माचे स्वरूप देउ इच्चीतात.धम्म म्हणजे नीती हे बाबासाहेबांनी सांगितलेले सूत्र विसरून पूजा,प्रार्थना,प्रतीकपूजा,या पारंपारिक धर्माच्या जंजाळात बौद्ध गुंतले आहेत.बाबासाहेबांच्या विचाराशी हा  घोर विश्वासघात होय.प्रार्थना,प्रतीकपूजा,या जन्जालातून बाहेर पडून विकार रहित माणूस बनण्याचा आपण निश्चय करणार नसू तर आंबेडकरांच्या क्रांतीचे विध्वन्स्कर्ते आपणच ठरू.


1Like ·  · 

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

PalahBiswas On Unique Identity No1.mpg

Tweeter

Blog Archive

Welcome Friends

Election 2008

MoneyControl Watch List

Google Finance Market Summary

Einstein Quote of the Day

Phone Arena

Computor

News Reel

Cricket

CNN

Google News

Al Jazeera

BBC

France 24

Market News

NASA

National Geographic

Wild Life

NBC

Sky TV